स्मरण फर्स्ट
त्या दिवशी गाडी चालवत होतो. मुंबईत गाडी चालवायची म्हणजे क्लच, ब्रेक आणि गिअर बरोबर झटापट ही आलीच. बदलत जाणारे गिअर्स आणि त्यामुळे बदलत जाणारा गाडीचा वेग यावरून एक कल्पना सुचली.
गाडी सुरु झाल्यावर तिला पुढे नेण्यासाठी आपण 'फर्स्ट गिअर' टाकतो. हा 'फर्स्ट गिअर' म्हणजे आपल्या जवळची सख्खी माणसं. आई-बाबा, जोडीदार, मुलं, जवळचे मित्र...
हा पहिला गिअर टाकल्याशिवाय गाडी पुढे जात नाही. मुंगीच्या गतीने का होईना गाडी न थांबता 'पुढे' जात राहिली पाहिजे हा पहिला 'संस्कार' फर्स्ट गिअर करतो.
इथे आपल्याला unconditional प्रेम मिळतं, सुरक्षितता मिळते. गाडी 'बंद पडणार नाही' याची पुरेपूर काळजी हा फर्स्ट गिअर घेतो. परंतु गाडी 'पळण्यासाठी' इतका कमी वेग पुरेसा नसतो.
आपण गाडीचा वेग वाढवतो. सेकंड गिअर टाकतो ! इथे आपल्याला घराबाहेरचं विश्व कळू लागतं.
शाळा, कॉलेज, पुस्तकं, मिडिया, आपले छंद, विविध कला..... बाहेरचं जग किती मोठं आहे आणि माहिती आणि ज्ञानामुळे हेच मोठं जग किती जवळ आलं आहे, हे कळतं.
समोर पसरलेला संधीचा आणि प्रगतीचा रस्ता आता आपल्याला खुणावू लागतो.
गाडीचा वेग आणखी वाढवण्यासाठी आपण आता थर्ड गिअर टाकतो. गाडीचा वेग आणखी वाढतो. हा थर्ड गिअर म्हणजे आपला नोकरी धंदा आणि त्यातून मिळणारं विना-खंडित उत्पन्न. गरजे पुरतं घर, कपडा लत्ता, भांडीकुंडी, पहिला फ्रीज, पहिला टीव्ही, प्रसंगानुरूप हॉटेलिंग, सणासुदीलानवीन कपडे, चांगले मार्क मिळाले तर मुलाला/मुलीला सायकल वगैरे थर्ड गिअरमध्ये येतं. या गिअरमध्ये आपण बऱ्यापैकी स्थिरावतो. गाडीचा वेग ना कमी ना जास्त. सेकंड मधून थर्ड गिअर मध्ये आलो तेव्हा वेग जास्त होता हे मान्य, पण आता तोच वेग कमी वाटू लागतो.आपण आता 'फोर्थ गिअर' टाकतो. गाडी सुसाट निघते. मनात आलं कीहॉटेलिंग-शॉपिंग-मल्टीप्लेक्स, गाडी, latest मोबाईल, 1 BHK मधून 2 BHK, laptop, ह्याउ नि त्याउ..!या वेगाची नशाच काही और! गम्मत म्हणजे आपण पाचव्या गिअर मध्ये कधी जातो हे आपल्यालाच कळत नाही.... आता गाडी अक्षरश: तरंगत जात असते. हजार... लाख... कोटी.... खर्व.... निखर्व...... रुपये नाहीत, गरजा!
हा 'वेग' खूप आनंददायी असतो. आपल्या गाडीच्या आड कोणी येऊ नये, ' लाल' सिग्नल लागू नये असं मनोमन वाटत असतं....
आणि... आणि......आणि...
... ‘नियती’ नावाचा एक स्पीडब्रेकर समोर येतो. तो खूप प्रचंड असतो.
गाडी थांबवण्यावाचून आता पर्याय नसतो. पाच.. चार.. तीन..दोन...एक....
खाट खाट गिअर मागे टाकत आपण आता neutral वर येतो. कचकावून ब्रेक लागतात. गाडी पूर्ण थांबते. आपल्या अंगाला खूप मोठा झटका बसतो.
पाचव्या गिअर मध्ये गाडी असताना आपण कधी काळी फर्स्ट गिअर देखील टाकला होता याचा विसर पडला होता. वरचा प्रत्येक गिअर टाकताना त्या गिअरची अशी एक मानसिकता होती...आज एक एक गिअर मागे येताना हे पहिल्यांदा जाणवलं.गाडी आता पूर्ण थांबली आहे. गाडी आता पुढे न्यायची आहे.. मला सांगा कुठला गिअर टाकाल?सुसाट वेगाचा पाचवा गिअर?
की मुंगीच्या वेगाचा पण गाडी चालू ठेवेल असा 'फर्स्ट गिअर'?
आयुष्यात जेव्हा पराभवाचे, निराशेचे क्षण आले होते, तेव्हा कोण होतं तुमच्या जवळ? कोणी दिला होता आधार ? आठवून पहा. प्लाज्मा टीव्हीने? EMI भरत विकत घेतलेल्या extra बेडरूमने? नव्या कोऱ्या गाडीने? 'You are promoted' असं लिहिलेल्या कागदाने?मी सांगतो कोण होतं तुमच्याजवळ. तुम्हाला आधार दिला होता फर्स्ट गिअरने!
आर्थिक अडचणीच्या वेळी आपल्या उशाखाली नोटांचं पुडकं हळूच ठेवून जाणारे बाबा, निरागस प्रश्न विचारून आपल्या चिंता घालवणारी आपली चिमुरडी मुलं, 'होईल सगळं व्यवस्थित' म्हणत डोक्याला बाम चोळून देणारी 'बायको'नावाची मैत्रीण, बाहेरचं खाऊन त्रास होऊ नये म्हणून पहाटे उठून पोळी भाजीचा डबा बनवणारी आई, 'त्या' काळात आपल्या Frustration चा‘कान’ होणारे आणि योग्य सल्ला देणारे जिवाभावाचे मित्र हे सगळे फर्स्ट गिअर तुमची गाडी ओढत नव्हते का?
Don't Get Me Wrong.
माझा चवथ्या-पाचव्या गिअर्सना आक्षेप नाही.
त्या वेगाची धुंदी जरूर अनुभवूया. त्याचा आनंदही उपभोगुया. फक्त त्यावेळी आपल्या 'फर्स्ट गिअर्स' चं स्मरण ठेवूया.आयुष्याचा वेग मधून मधून थोssडा कमी करत पुन्हा एकदा फर्स्ट गिअरवर येऊया.सुसाट वेगाचा 'arrogance' इथे नाही... गाडी थोडी हळू चालेल हे मान्य. 'फर्स्ट गिअरचं' अस्तित्व लक्षात घ्यावंच लागेल असा हा वेग असेल.त्या निवांतपणाशी थोडं खेळूया आणि मग टाकूया पुढचा गिअर!जाता जाता आणखी एक.
स्वत:लाच एक प्रश्न विचारूया...
दुसऱ्या कुणाच्या आयुष्याचा मी बनू शकेन का ‘फर्स्ट गिअर’?
Thursday, September 15, 2011
Wednesday, September 14, 2011
The nine Navratri colors for 2011
Pratipada - September 28, 2011 (Wednesday) - Blue
Dwitiya/Tritiya - September 29 (Thursday) - Yellow
Chaturthi - September 30 (Friday) - Green
Panchami - October 1 (Saturday) - Grey
Sashti - October 2 (Sunday) - Orange
Saptami - October 3 (Monday) - White
Ashtami - October 4 (Tuesday) - Red
Navami - October 5 (Wednesday) - Purple
Monday, September 12, 2011
'तेजुकाया'वर आघात
मिरवणुकीतील अपघाताने गणेशभक्तांवर दु:खाचा डोंगर
दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या जल्लोषात मिरवणूक निघाली... 'ही शान कुणाची, तेजुकायाच्या राजाची' घोषणा आसमंतात दुमदुमली... मिरवणूक चिंचपोकळी ब्रिजजवळ आली आणि तो अपघात घडला... नियतीची काय इच्छा होती माहीत नाही, पण आमच्यावर आलेले विघ्न बाप्पाने कदाचित आपल्या अंगावर झेलेले आणि आम्हाला सुखरूप ठेवले... अत्यंत जड अंत:करणाने 'तेजुकाया मॅन्शन'चे कार्यकर्ते सांगत होते.
विसर्जनाची मिरवणूक जल्लोषात पुढे सरकत असतानाच ट्रॉलीवरून गणरायाची मूतीर् खाली कोसळली. या अपघातानंतर 'तेजुकाया मॅन्शन'च्या घराघरांतील उदास चेहरे रविवारी त्यांच्यावर कोणता जीवघेणा प्रसंग आला, हे स्पष्ट सांगत होते. गेली ४६ वर्षे तेजुकायामध्ये गणेशोत्सव साजरा होतो आहे. २००२ पासून मंडळाची मूतीर् लक्षवेधी ठरत आहे. शिस्तबद्धपणासाठी ख्याती असलेल्या या मंडळाने उत्सवाचे पावित्र्य निष्ठेने जपले आहे. यंदाची अनंत चतुदशीर् मात्र कधीही भरून येणाऱ्या जखमेसारखी आयुष्यभर टोचत राहील, असे सांगताना कार्यर्कत्यांचा बांध फुटला आणि डोळे पाणावले. गिरणगावाच्या पुनविर्कासात नव्याने उभारी घेत असलेल्या 'तेजुकाया मॅन्शन'ची चाळ पाडून पुढील वषीर् उत्सव टॉवरमध्ये साजरा होणार आहे. झालेला आघात कल्पनेपलीकडचा आहे. काय झाले ते शब्दांत सांगता येणार नाही. आमच्यावर आभाळच कोसळले. भक्तांवर आलेले विघ्न बाप्पाने कदाचित आपल्यावर झेलले आणि आम्हाला सुखरूप ठेवले, असे मंडळाचे अध्यक्ष अरूण गावकर यांनी सांगितले. या बिकट प्रसंगात लालबागचा राजा, गणेशगल्ली मंडळाच्या कार्यर्कत्यांनी 'तेजुकाया'ला धीर देत सोबत केली.
उंचीचा वाद नको
अपघातामुळे अनेक जण मूतीर्च्या उंचीचा वाद नाहक उकरून काढत आहेत. आमची मूतीर् ही फक्त १५ फुटांची होती. गणरायांच्या आगमन-विसर्जन मिरवणुकीत सुरक्षेची सर्वतोपरी काळजी घेतली जाते. समुदात विसर्जन करतानाही मूतीर्च्या सुरक्षेला नेहमीच प्राधान्य दिले आहे. ही घटना हा निव्वळ अपघात असून त्यावर अधिक चर्चा करून उत्सवाचे पावित्र्य बिघडवू नये, असे आवाहन गावकर यांनी केले.

सौजन्य:मटा ऑनलाइन
मुंबईत गणपती विसर्जन मिरवणुकीत दोन अपघात, १ ठार
मुंबईत गणपती विसर्जन मिरवणुकीला दोन अपघातांमुळे गालबोट लागले आहे. लालबागचा राजा भारतमाता थिएटरजवळून जात असताना एका जुन्या इमारतीची गॅलरी पडल्याने एका वृद्धाचा मृत्यू झाला आणि पाचजण जखमी झाले. त्या पाठोपाठ चिंचपोकळी येथे तेजूकाया गणपती मंडळाची गणेश मूर्ती कोसळून दोनजण जखमी झाले.
सकाळी लालबागच्या राजाची मिरवणूक निघाली. मिरवणूक भारतमाता जवळ येताच राजावर पुष्पवृष्टी केली जाते. हा सोहळा पाहण्यासाठी भक्तांनी रस्त्यावर तसेच आसपासच्या इमारतीच्या खिडक्या आणि गॅल-यांमध्ये प्रचंड गर्दी केली. तब्बल ६०-७० वर्षे जुन्या इमारतीच्या तळमजल्यावर, दुकानाच्या पत्र्याच्या छपरावर आणि पहिल्या मजल्याच्या गॅलरीत प्रमाणापेक्षा जास्त नागरिक दाटीवाटीने उभे होते. अतिरिक्त भार आल्यामुळे अखेर गॅलरीचा काही भाग आणि त्याला लागून असलेला दुकानाच्या छताचा पत्रा कोसळला. गॅलरीतले लोक खाली पडले. या अपघातात एका वृद्धाचा मृत्यू झाला. एक लहान मुलगा, महिला आणि तीन पुरुष जखमी झाले. अनेकांना किरकोळ जखमा झाल्या.
पोलिसांनी जखमी झालेल्यांना केइएममध्ये दाखल केले आणि किरकोळ जखमींना घटनास्थळीच तातडीने वैद्यकीय मदत दिली.
अपघाताच्या धक्क्यातून सावरण्याआधीच भारतमाता पासून काही मिनिटांच्या अंतरावर चिंचपोकळीतील गणेश टॉकीज येथे तेजूकाया गणपती मंडळाची गणेश मूर्ती कोसळली. हा प्रकार कसा झाला ते अद्याप समजलेले नाही. मात्र मूर्ती अंगावर पडल्याने दोनजण जखमी झाल्याचे समजते.
दरम्यान, पोलिसांनी नागरिकांना विसर्जन मिरवणुकीत नियमांचे पालन करण्याचे आणि स्वतःची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

Tuesday, September 6, 2011
Friday, September 2, 2011
भाऊंचा 'अजिंक्य' गणेश
ब्रिटीशकालीन मुंबई शहराच्या आधुनिकीकरणाच्या वाटचालीत ' भाऊचा धक्का ' हा माइलस्टोन आहे . देशपरदेशातून मालवाहतूक करणाऱ्या बोटींसाठी आणि कोकणातील प्रवाशांसाठी समुद्र हटवून बंदर बांधण्याची किमया लक्ष्मण हरिश्चंद्र अजिंक्य ऊर्फ भाऊ रसूल यांनी केली . भाऊच्या धक्क्याइतकीच ऐतिहासिक परंपरा त्यांच्या घरच्या गणेशोत्सवालाही आहे . भाऊंच्या घरातील गणपतीचे यंदा १६७ वर्ष आहे .
भाऊंनी आपला मुलगा रामचंद्र याला मूल होणार या आनंदात १८४५ मध्ये घरी गणपती आणण्याची परंपरा सुरू केली . २०० वर्षांपूर्वी १८४५ ते १८९५ दरम्यान गिरगावात , १८९६ ते १९३५ परळ आणि १९३६ पासून आतापर्यंत प्रताप मॅन्शन , डॉ . बाबासाहेब आंबेडकर मार्ग , दादर टी . टी . येथील घरात सहा पिढ्यांनी गणपती आणण्याची परंपरा जपली आहे . गणपतीचा चौरंग , समया , पूजेची भांडी हे साहित्य वंशपरंपरागत चालत आलेले आहे . पूजेतील पंचामृताची भांडी औरंगजेबाचे मुलगे आज्जमशाह आणि कामबक्ष यांच्या काळातील चलनी नाण्यांना चांदीचे जोडकाम देऊन बनवण्यात आली आहेत . गणपतीमागचा आरसाही १०० वर्षांपूर्वीचा आहे . विश्वास नारायण अजिंक्य हे भाऊंचे सहावे वंशज गणेशोत्सवाची ही वैभवशाली परंपरा जपत आहेत .
हजार नाण्यांचा संग्रह
अजिंक्य यांच्या घरच्या संग्रहात धनाच्या पेटीतून वंशपरंपरेने आलेली शिवकालीन , होळकर , बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड , ब्रिटीशकालीन अशी एक हजार नाणी आहेत . १०० वर्षांपेक्षा अधिक जुनी कपाटे , बिजागरावर ' मेड इन विन व्हिक्टोरियन लंडन ' लिहिलेले शिसवी लाकडाचे जुने पेटारे , पोर्तुगीज खेळणी अशा अनेक पुरातन वस्तू अजिंक्य कुटुंबीयांच्या संग्रही आहेत . स्वत : भाऊ , मुलगा रामचंद्र व नातू विनायक अशा तीन पिढ्या अक्कलकोटच्या स्वामी समर्थांना प्रत्यक्ष भेटल्या असून स्वामींनी १८७० मध्ये स्वहस्ते दिलेल्या चर्मपादुका अजिंक्य यांच्या घरात आहेत .
भाऊ रसूल नावाचा इतिहास
तत्कालीन धाकट्या कुलाब्यात १८२३ मध्ये सुरू झालेल्या ' गन गॅरिएज फॅक्टरी ' मध्ये लक्ष्मण अजिंक्य नोकरीस होते . कॅप्टन रसेल हे तेथील त्यांचे वरिष्ठ होते . कारखान्यातील एका मजुराला क्षुल्लक कारणावरून काठीने झोडपून काढण्याची शिक्षा वरिष्ठांनी दिली होती . त्यात लक्ष्मण यांनी हस्तक्षेप करून ती रद्द केली . त्यामुळे कामगार आदराने त्यांना भाऊ म्हणू लागले . रसेल यांच्याशी असलेल्या स्नेहाच्या संबंधामुळे पुढे ते भाऊ रसूल या नावाने ओळखले जाऊ लागले .

Subscribe to:
Posts (Atom)