Monday, October 25, 2010

Mumbai Local Train timetable - now on ur fingertips...


Very Very Helpful for people using daily train services…..
Check this website for time table of all the suburban local trains in Mumbai.


# 1) http://www.mumbailifeline.com/ (for browsing in PC)

# 2) http://www.mumbailifeline.com/m (for browsing in mobile)

Thursday, September 16, 2010


चवथीचे दिवस
- प्रवीण दशरथ बांदकेर


गणपतीच्या त्या पाच-सात-नऊ किंवा अकरा दिवसांत तऱ्हेतऱ्हेच्या गोडधोड पदार्थांची, चवदार रानभाज्यांची नुसती चंगळ असते. त्यातही लक्षात राहतं ते काळ्या वाटाण्यांचं भरपूर खोबरं घातलेलं सांबारं आणि हळदीच्या पानातल्या पातोळ्या. पिढ्यान् पिढ्यापासून आजवर कायम असलेली, जागतिकीकरणाच्या या दिवसांताही न बदलेली ती चव पुढे वर्षभर जिभेवर रेंगाळत राहते. .................

नागपंचमीला
सवड काढून सहकुटुंब गावी गेलो होतो. नागोबाची पूजा वगैरे आटोपल्यावर आई म्हणाली, ''गणपतीचो पाट देवून ये, काशी परबाकडे!'' मी तर हे विसरलोच होतो. बरं झालं, आईनेच आठवण केली ते. माळ्यावर चढून खास गणपतीसाठी बनवून घेतलेला भलामोठा पाट खाली काढला. धुवून पुसून साफसूफ केला. दर वषीर् न चुकता नागपंचमीच्या दिवशी गणपतीचा पाट गणपतीच्या शाळेत नेऊन द्यायचा. तिथे तोपर्यंत गणपतीच्या मूतीर् घडवायला सुरुवातही झालेली असायची. आपल्याला कसली मूतीर् हवी ते त्याला सांगायचं. घडवलेल्या मूतीर्ंपैकी एखादी आपल्याला आवडली असली तर तीच पाटावर बसून घ्यायची. मग पुढल्या काही दिवसांत त्याचं रंगकाम वगैरे होतं. आमच्याकडे 'चवथी'च्या-गणेश चतुथीर्च्या सणाची तयारी महिनाभर आधी नागपंचमीपासूनच होत असते. गणपतीच्या शाळांतून गणपतीची माती मळणे, साचे करणे, साच्यातून काढलेल्या गणपती पॉलिश करणे, पांढरा रंग काढणे, बाकीचं रंगकाम, नजर उघडणं... अखेरच्या दिवसापर्यंत अशी कामं हातघाईवर असतात. जसजशा गणपतीच्या मूतीर् पूर्णत्वाकडे झुकायला लागतात, तसा 'चवथी'चा सण अंगात भिनायला सुरुवात होते. गणोबाच्या आगमनाचा दिवस जवळ यायला लागला की गावातही घराघरांत गडबड सुरू होते. घराची साफसफाई, रंगरंगोटी, सारवणं, पांढऱ्या शेडीच्या रांगोळ्या, सजावट, भांडीकुंडी, फनिर्चर्स नदीवर नेऊन धुवून काढणं, मखराची आरास करणं, भिंतीवर कमळ मोडणं, चित्र रंगवणं, माटीचं सामान गोळा करायला रानात, डोंगरात वणवणणं, याशिवाय बाजारहाट करणं, आठपंधरा दिवसांचा किराणा, भाज्या, तेलापासून उदबत्त्यांपर्यंतचं देवसामान घरात भरणं... किती कामं. माणसं अनिवार उत्साहाने ती पार पडत असतात. गणोबाच्या तयारीत काही कसूर राहायला नको. या तयारीत हातभार लावायच्या निमित्ताने मुद्दामहून घराघरांत येणारे मुंबईकर चाकरमानी पाहुणे हाही कोकणातल्या 'चवथी'चा खास सांस्कृतिक विशेषच म्हणायला हवा. घरोघर गणपती पुजायची कोकण आणि गोमंतकातली ही प्रथा अति प्राचीन असल्याचे पुरावे उपलब्ध आहेत. कोकणात लिंगपूजक शैवपंथियांचे सुमारे दोनेक हजार वर्षांपूवीर्पासून प्रस्थ होते. गावोगाव असलेली शंकराची प्राचीन मंदिरे याची साक्ष आहेत. या शिवाचा मुख्य गण असलेला हा गणांचा अधिपती गणपती. कृषिजन्य संस्कृतीत उदंरासाख्या कुणब्या- शेतकऱ्यांच्या शत्रूला आपल्या ताब्यात ठेवणाऱ्या या गणाधीशाला महत्त्व येणे साहजिकच आहे. शेतीचा कामधंदा आटोपल्यावरच 'चवथी'चा हा सण येतो, हेही या अर्थाने सूचक असेच आहे. गणपतीची मूतीर् जिथे पुजायची त्या खोलीतली आरास हा एक वेगळाच विषय आहे. आजच्यासारखी आधुनिक साधने- तऱ्हेतऱ्हेचे रंग, सजावटीचं सामान, इलेक्ट्रिकचे रंगीबेरंगी झगमगते दिवे असलं काहीच नव्हतं. तेव्हाच्या दिवसांत रानात उपलब्ध असणाऱ्या पानाफुलांनीच आरास केली जायची. आजही त्या परंपरेची आठवण करून गणपतीच्या मूतीर्च्यावर टांगलेल्या माटवीला वेगवेगळ्या प्रकारची रानफुले, रानफळे टांगली जातात, वर्डस्वर्थ कवीच्या डॅफोडिल्स फुलांची आठवण करून देणारी पिवळ्याधम्मक रंगाची छोटी नाजूक हरणांची फुलं, त्याशिवाय कवंडळं, कांगली, सीतेचे केस, शेरवडं, धानोळी, हसोळी.... आणि आंब्याचे टाळ तर असतातच. असं काय काय... माटी गच्च भरून टाकणारं. गणपतीच्या पाठीमागच्या भिंतीवर कमळाचं चित्रं रंगवायची प्रथा आहे. त्यासाठी 'कमळ मोडणे' असा शब्दप्रयोग आहे. एखाद्या वेळी एखाद्याच्या घरात त्या वर्षभरात एखादा मृत्यू झाला असेल तर कमळाऐवजी तुळस किंवा वडाचं चित्र रंगवलं जातं. म्हणजे बाईचा मृत्यू असेल तर तुळस आणि पुरुष असेल तर वडाचं झाड. विचार करता, ही चित्रंसुद्धा किती आपल्या संस्कृतीला जवळची जाणारी आहेत, असं नेहमीच मनात येत राहतं. एखाद्या नव्या घरात पहिल्यांदाच गणपती पूजला जातो, तेव्हा त्या घरासमोर भल्या पहाटे गणपतीची छोटीशी मूतीर् कुणीतरी गुपचूप आणून ठेवतो, नि फटाके वाजवतो. मग घरातले ती मूतीर् घरात घेऊन तिची विधीवत पूजा करतात. ही प्रथा कशी काय पडली असावी कोण जाणे! माझ्या लहानपणापासून गणपतीचा पहिला दिवस गणपतीची विधिवत प्राणप्रतिष्ठा करणाऱ्या भटजींची प्रतीक्षा करण्यातच सरल्याचा आठवतो आहे. भल्या सकाळी कधीतरी बिचारे भटजीबुवा बाहेर पडलेले असतात. एकेक घर घेत पुढे सरकताना घड्याळाचा काटाही वेगाने पुढे सरकत असतो. पोरांच्याच्या नव्हे, तर मोठ्यांच्याही पोटात उंदीर फिरायला लागलेले असतात. गणपतीच्या त्या पाच-सात-नऊ किंवा अकरा दिवसांत तऱ्हेतऱ्हेच्या गोडधोड पदार्थांची, चवदार रानभाज्यांची नुसती चंगळ असते. त्यातही लक्षात राहतं ते काळ्या वाटाण्यांचं भरपूर खोबरं घातलेलं सांबारं आणि हळदीच्या पानातल्या पातोळ्या. पिढ्यान् पिढ्यापासून आजवर कायम असलेली, जागतिकीकरणाच्या या दिवसांतही न बदललेली ती चव पुढे वर्षभर जिभेवर रेंगाळत राहते. अशीच एक रेंगाळणारी चव म्हणजे भजनातल्या उसळीची. चवथीच्या भजनांची परंपराही कित्येक पिढ्यांची भजनानंतर दिल्या जाणाऱ्या चविष्ट खमंग उसळीचं आकर्षण पोरासोरांइतकंच म्हाताऱ्याकोताकऱ्यांनाही. काही काही घरांतून तर काजूगरांचीही उसळ दिली जायची. लहानपणी आम्ही पोरं केवळ त्या तसल्या उसळीसाठी जाग्रणं करीत, पंेगत भजनांना हजेरी लावायचे. आमच्या गावात काही अतिशय गोड गळ्याचे गाणारे भजनीबुवा आहेत. माझे एक मुंबईकर काकाही भजनीबुवा म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध होते. खास भजनांच्या ओढीने ते गणपतीला गावी यायचे. आमच्याकडे वारकरी पद्धतीने केल्या जाणाऱ्या बैठ्या भजनाची परंपरा आहे. मला तरी तुकोबाचे अनेक दुमीर्ळ पारंपारिक अभंग ऐकणं केवळ या चवथीच्या भजनांमुळेच शक्य झालं आहे. गणपतीच्या दुसऱ्या दिवशी गावाच्या पाठीशी असलेल्या डोंगरातल्या देवाकडे जाण्याची आमच्या गावाची अशीच एक जुनी प्रथा आहे. तिथे एका जागी झाडापेडांची धनदाट दाटी, वडाची विस्तारलेली झाडं, त्याला वेढून मनगटाएवढ्या जाडजूड वेली वगैरे. त्यातच वाढलेली प्राचीन वारुळं. ते ग्रामदैवत खेतेश्वराचं स्थान, त्या दिवशी गावकार नाईकाच्या अंगात त्याचा संचार होतो. लोक त्याला अडीअडचणी सांगतात. उपाय विचारतात. नवस करतात. आदल्या सालाचे नवस फेडतात. गाऱ्हाणी घालतात. हा देव नाईकाच्या कुडीत संचारला की तो आरडाओरडा करायला, कुदायला सुरुवात करतो. तो तसा ओरडायला लागला की लहनपणी काळजाचा ठेका चुकायचा. अंगात संचार आला की त्या तोळामासा भासणाऱ्या देहात दहा माणसांना न आवणारी ताकद कुठनं येते कोण जाणे! गणपतीचा दुसरा दिवस म्हणजे उंदीरबीचा दिवस. या दिवशी गणपतीच्या वाहनांचा उंदराचा मान. या दिवशी बाकी पक्वान्नं काहीही केली तरी तांदळाची खीर, आंबोळ्या आणि पाच वनस्पतींच्या पानांची भाजीचा मेनू हवाच. या भाजीमध्ये शेवग्याची पाने, चवळीचा पाला, टाकळ्याची पानं, भोपळीचा पाला, उदडाची पानं अशा काही रानभाज्यांची पानं कमीजास्त प्रमाणात एकत्रित शिजवलेली असतात. या नेवैद्याचं एक स्वतंत्र पान खास उंदीरमामांसाठी तयार केलं जातं. ते शेतात नेऊन त्याच्यासाठी ठेवलं जातं. पशुपक्ष्यांचा, चराचर, पर्यावरणातील सगळ्या घटकांचा विचार यामागे असू शकतो. हळदीच्या पाच पानांच्या रोपट्यापासून बनवलेल्या निसर्गकन्या गौराईला दाखवण्यात येणारा नैवैद्यही थोड्याफार फरकानं असाच असतो. शेवटी विसर्जनाचा दिवस येतो तेव्हा गलबलायला होतं. विसर्जनाच्या दिवशीच्या जेवणाला म्हामन्याचं जेवण म्हटलं जातं. या जेवणासाठी कुणाला तरी शेजाऱ्यापाजाऱ्याला ओळखीच्याला वगैरे 'पातकरी' म्हणून जेवायला बोलावलं जातं. हा 'पातकरी' म्हणजे मुळातला पथकरी किंवा पथिक कुणीतरी असावा. त्याचा अपभ्रंश होऊन पाथकरी-पातकरी झाला असावा. या पातकरीची यजमानासकट कुटुंबातले सगळे सेवा करतात. थोडक्यात काय तर, कुण्यातरी पथिकाला-वाटसरूला खास पाहुणा म्हणून भोजन देण्याची ही प्राचीन भारतीय संस्कृतीशी नाते जोडणारी सुंदर प्रथा. म्हामन्याचे जेवण आटोपलं की विसर्जनाची गडबड. शेवटची आरती, निरोपाचं गाऱ्हाणं, दारात रांगोळी, शिरवणीची-प्रसादाची तयारी करणं, गणपती नदीपर्यंत घेऊन जाणारे झिलगे शोधून आणणं, सगळीच धांदल. गणपती घराबाहेर यायला लागतात. फटाके, ढोलताशी, भजनं व बाप्पा मोरया, पुढच्या वषीर् लवकर या... चा गजरं. नदीकाठी पोरांचा कल्लोळ सुरू असतो. नाचगाणी, फुगड्या, भजनं व कान किटवणारे फटाके. पुन्हा एक महाआरती. गावाच्या कल्याणासाठी महागाऱ्हाणं आणि मोरया मोरयाच्या गजरात बाप्पांना निरोप दिला जातो. प्रसादानं भरलेल्या ओंजळी घंेऊन घराकडे परतताना पावलं जडावलेली असतात. डोळेही भरलेल. रिकामा चौरंग, चैतन्य हवरलेली माटी, रिकामी भिंत. गेल्या पाच दिवसांपासून अहोरात्र तेवणारा नंदादीपही आता उरलंसुरलं तेल संपवायला निस्तेजपणे तेवतोय, असं वाटत राहातं. मनातल्या मनात गणपती बाप्पांमागोमाग आता आपल्यालाही हे गाव, हे घर सोडून कामाधंद्याच्या गावी जायला हवंय, हेही जाणवत असतं. शेवटी काय, आपणही पाच दिवसांचे गणपती हेच खरं.

Wednesday, September 15, 2010

लालबागचा राजा २०१०

लालबागचा राजा २०१०




Friday, August 6, 2010

Won’t take Autos, Cabs on August 12, Commuter strike

Won’t take Autos, Cabs on August 12
Revenge of the commuters

Tired of being fleeced by auto and taxi drivers, three Mumbai residents call for a one-day strike

Have you ever been refused a ride by an autowallah or a cabbie? Did that leave you fuming? If your answer is ‘yes’ to both these questions, here is your chance to get back at them.

Three advertising professionals -- Abhilash Krishnan, Rachna Brar and Jaidev Rupani -- have launched a campaign against greedy cabbies and autowallahs who refuse fares for short distances and tamper with meters to fleece commuters.The centrepiece of this campaign will be the August 12 commuters’ strike, when anyone who has ever been wronged by an auto or a taxi driver must shun them.

A web site - http://www.meterjam.com/ - has been created to generate awareness about the campaign and to get people to sign up for the strike.The web site, which went up on Monday, has received a good response. "Around 600 people have already signed up to skip auto/taxi rides on August 12," said Rupani.


Jaidev Rupani, Rachna Brar and Abhilash Krishnan
Meter Jam's Facebook page already has 844 'like it' entries and has kicked off a debate, with people demanding such a campaign for other cities too. On twitter, however, Meter Jam has only six followers.Meter Jam's message on Facebook says, "Taxi and auto rickshaw are part of public services. Unfortunately in India, there is no proper control or rule book to facilitate the smooth running of this service.
Taxi and auto meters are manipulated and commuters pay more than what they have to. It's time for public to put across their say in the matter with Meter Jam."
Explaining the concept, Rachana Brar, 28, said: "Meter Jam is our response to taxi and auto drivers' dadagiri. They must know that commuters can hit back."

Abhilash Krishnan, her colleague, said: "We just don't want to talk about it. This will be our non-cooperation movement."

Taximen’s Union chief A L Quadros said, “I will apprise committee members of this campaign. We will have to decide our strategy.”
Spread this news to as many people as u know.....

Tuesday, June 29, 2010

New Auto Rickshaw Fare chart details in Mumbai
Here is the detail of the New fare chart of Auto Rickshaw effective from 24th June 2010. The fair is only applicable for CNG vehicles so make sure when you ride you check on it.


Tuesday, February 23, 2010

हेल्पलाइन - एका पानात सर्व माहिती (from maharashtratimes.com)

हेल्पलाइन - एका पानात सर्व माहिती (from maharashtratimes.com )
महाराष्ट्र टाइम्स सादर करत आहे एक असे पान ज्यावर तुम्हाला सगळी माहिती क्लिक सरशी मिळू शकेल. पासपोर्ट बनवायचे असोत किंवा क्रेडिट कार्ड मिळवायचे असो किंवा एखाद्या फ्रॉडविषयी तक्रार करायची असो, सर्वच प्रकारची माहिती तुम्हाला येथे मिळणार आहे.यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या साइट्सचा शोध घेत इंटरनेटवर भटकंती करण्याची किंवा सर्च करत बसण्याची गरज भासणार नाही. आम्ही तुम्हाला योग्य ठिकाणी नेऊन खरी माहिती पुरविणार आहोत. माहितीचा हा खजिना दिवसेंदिवस वाढतच जाणार आहे. तुम्हाला हव्या असलेल्या माहितीची लिंक जर या ठिकाणी उपलब्ध नसेल तर कृपया आम्हाला सांगा. आम्ही ती माहिती अपडेट करून घेऊ.

अडचणीच्या काळात उपयोगात येणारे नंबर
महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य सुविधा
जे.जे. हॉस्पिटल, मुंबई
ससून रुग्णालय, पुणे
राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्था
आरोग्याची काळजी कशी घ्यावी
केईएम हॉस्पिटल-मुंबई
शासकीय रुग्णालय, नागपूर
टाटा स्मृती कँसर हॉस्पिटल,मुंबई
वैद्यकीय शिक्षण
राम मनोहर लोहिया शासकीय रुग्णालय, दिल्ली

टॅक्स
इन्कमटॅक्स रिटर्न ऑनलाइन कसे भरावे
संपत्ती कर कुठे भरावा
एक्साइज आणि सर्विस टॅक्स रिटर्न
नोंदणी आणि मुद्रांक शुल्क कुठे भरावे

उद्योग-व्यवसाय सुरु करण्याविषयी
नवीन उद्योग कसा सुरु करावा
व्यवसाय व्यवस्थापन कसे करावे
व्यवसाय बंद कसा करावा
व्यवसायासाठी निधी कसा उभारावा
मुंबई शेअर बाजार
परराष्ट्रात व्यवसाय कसा सुरु करावा

कुठे आणि कसा अर्ज करावा
मतदार यादीत नाव कसे दाखल करावे
म्हाडाच्या घरासाठी अर्ज कसा करावा
रोजगार मिळविण्यासाठी नोंदणी
RTI अंतर्गत माहिती कशी मिळवावी
कॉपीराइट साठी अर्ज
शस्त्र परवाना कुठून मिळवावा
पेटंटसाठी कुठे अर्ज करावा
रेशन कार्डसाठी अर्ज
PAN कार्ड कसे मिळवावे
नोकरी कशी शोधावी
पासपोर्टसाठी अर्ज कुठे करावा
वाहन नोंदणी कशी करावी
डिजिटल सही कशी मिळवावी

तक्रारः कुठे आणि कशी दाखल करावी
सरकारविरोधात तक्रार कुठे करावी
केंद्रीय दक्षता आयोगात तक्रार कशी करावी
राष्ट्रपतींकडे तक्रार कशी करावी
कामगार आयुक्तांकडे तक्रार कशी करावी
.IN डोमेन कसे नोंदवावे
CBI कडे तक्रार कशी करावी
मोबाइल/लॅंडलाइन फोनविषयी तक्रार कुठे करावी
मानवाधिकार उल्लंघनाबाबत तक्रार
महिला आयोगात कुठे तक्रार द्यावी

शोध घ्या/पत्ता मिळवा
रेल्वे तिकीटची PNR स्थिती
पासपोर्ट अर्जाची स्थिती
महाराष्ट्रातील पर्यटनस्थळे
संसदेचे अधिनियम
महाराष्ट्रातील ऑनलाइन जिल्हे
कृषी हवामान
बाळासाठी पोषक आहार
भारत सरकारच्या टेंडर्सविषयी
इंडियन एअरलाइन्स विमानांचे वेळापत्रक
प्रौढांसाठी पोषक आहार
आयुर्वेद/योग/निसर्गोपचाराविषयी माहिती
न्यायालयात दाखल प्रकरणांची सद्दस्थिती
शरीरातील मेद
चोरी गेलेल्या गाड्यांची स्थिती
ISD Codes कसे शोधाल
PIN Code कसे शोधाल
कृषी मंडईतले भाव
स्पीडपोस्टची स्थिती
कोर्टाचे आदेश
परिक्षांचे निकाल
जमिनीचे रेकॉर्ड
शेतक-यांसाठीच्या योजना
NGO साठी सरकारी योजना
लोकसभा/राज्यसभा सदस्यांची माहिती
गृहिणींसाठी किचन टीप्स
न्यायालयांची कॉजलिस्ट
महिलांची प्रजनक्षमता
केंद्र शासनाच्या कर्मचा-यांसाठी आरोग्य सुविधा
विक्रीकर कुठे भरावा
STD Codes कसे शोधाल

ऑनलाइन खरेदी/भरणा
रेल्वे तिकीट
एस.टी. तिकीट
MTNL बिल
मुंबई लोकलचा मासिक पास
विमान तिकीट
मुंबईत ट्रॅफिक चलान

प्रमाणपत्र कुठून मिळवावे
जन्म प्रमाणपत्र
ड्राइव्हिंग लायसन्स
जात प्रमाणपत्र
डोमिसाइल प्रमाणपत्र
मृत्यू प्रमाणपत्र
अपंगांसाठी ओळखपत्र
विवाह प्रमाणपत्र

पोलिस वेबसाइट
महाराष्ट्र पोलिस
मुंबई ट्रॅफिक पोलिस
ठाणे शहर पोलिस
नागपूर शहर पोलिस
अॅन्टी करप्शन विभाग
ग्राहक तक्रार मंच
गुजरात पोलिस
मध्यप्रदेश पोलिस
CBI (नवी दिल्ली)
दिल्ली ट्रॅफिक पोलिस
मुंबई पोलिस
पुणे शहर पोलिस
नाशिक शहर पोलिस
Cyber Crime विभाग
CID, महाराष्ट्र
कर्नाटक पोलिस
गोवा पोलिस
आंध्र प्रदेश पोलिस
दिल्ली पोलिस

Monday, February 8, 2010

Wednesday, January 27, 2010

इ-मेल करा मोठी फाइल

इ-मेल करा मोठी फाइल
कामाच्या भल्यामोठ्या फाइल ई-मेलवरून कशा पाठवयाच्या असा प्रश्न पडलाय... तर त्यावर उपायही आहे. .....................

टेलिफोन लाइनमधून इंटरनेट, मग केबलमधून, नंतर ब्रॉडबँड केबलमधून असा प्रवास करत यूएसबी मोडेम या केबलरहित म्हणजेच वायरलेस इंटरनेट वापरात आलं आहे. इंटरनेटची केबल वायरलेस मोडेमला जोडली की त्याच्या जवळच्या काही परिसरामध्ये आपण कम्प्युटरमधील वाय-फाय प्रणालीच्या मदतीने इंटरनेट वापरू शकतो. परंतु यामध्ये त्या वायरलेस मोडेमच्या जवळपासच्या कम्प्युटरवरच चांगल्या प्रकारे इंटरनेट चालतं. म्हणून मग प्रवासामध्ये अथवा बाहेरगावी असताना इंटरनेटमुळे थांबणारी कामं यूएसबी मोडेमच्या मदतीने पूर्ण होऊ लागली. इंटरनेटचा वेग आता वाढलाय. साधारण दहा वर्षापूवीर् इंटरनेटचा वेग हा जेमतेमच होता साधारण ८-१६ केबी/पीएस म्हणजेच ८ ते १६ किलो बाइट साइज एका सेकंदाला. तर सध्या इंटरनेटचा वेग आता एका सेकंदाला मेगाबाइटवरून गिगाबाइटच्या दिशेने चालला आहे. म्हणजेच मोठ्या आकाराची फाइल आपण काही सेकंदात इ-मेलने पाठवू शकतो.

इंटरनेटचा वेग जितका जास्त तितकी फाइल लवकर पाठवली जाते. इंटरनेटची प्रणाली आणि इंटरनेटचा वेग यामध्ये जरी आमूलाग्र बदल झाले असले तरी इ-मेलने फाइलने पाठवण्याच्या क्षमतेमध्ये अजून तितकीशी प्रगती झालेली दिसत नाही. आजही जी-मेल, याहू, हॉटमेल आणि रिडीफ यासारख्या मोफत इ-मेल सेवा देणाऱ्या कंपन्या २० एमबीपेक्षा मोठी फाइल पाठवण्याची सेवा देत नाहीत. विकत इ-मेल सेवा देणाऱ्या कंपन्याही २०-२५ एमबीपेक्षा मोठी फाइल इ-मेलनं पाठवण्याची सोय देत नाहीत. व्हिडीओ अथवा काही वेगळ्या कामाच्या फाइल्स ज्याची साइज काही एमबी ते जीबी इतकी असते त्या इ-मेलवरून पाठवणं शक्य होत नाही. परिणामी आपलं काम थांबतं.

आकाराने मोठ्या असलेल्या फाइल्स पाठवण्यासाठीच सध्या निरनिराळ्या वेबसाइट सुरू झाल्या आहेत. ही सेवाही त्या मोफत देत असतात. अशा वेबसाइटवर आपल्याला आपलं नाव आणि इ-मेल तसंच ज्याला ती मोठी फाइल पाठवायची असेल त्याचं नाव आणि इ-मेल द्यायचा असतो. तिथे आपली भली मोठी फाइल 'अटॅच' करण्याची सोय असते. इथे ती फाइल त्या वेबसाइटवर अपलोड होते आणि मग ती तेथून डाउनलोड करण्याची लिंक आपल्याला ज्याला ती फाइल पाठवायची असेल त्याला जाते. त्या व्यक्तीने त्याला आलेल्या इ-मेलमध्ये दिलेल्या फाइल डाऊनलोडच्या लिंकवर क्लिक केल्यास ती फाइल डाउनलोड करता येते. अशा प्रकारे आपणास जी मोठी फाइल इ-मेलनं पाठवायची असते ती प्रत्यक्ष त्या व्यक्तीला न जाता ती त्या वेबसाइटवरवर अपलोड होते आणि त्या फाइलला डाउनलोड करण्याचीच लिंक इ-मेलमध्ये पाठवली जाते.

अशा प्रकारची सेवा विकतही दिली जाते. मोफत सेवेमध्ये जास्तीत जास्त २ जीबीपर्यंतचीच फाइल आपण दुसऱ्याला पाठवू शकतो तर त्यापेक्षा मोठ्या फाइलसाठी काही पैसे मोजावे लागतात. बऱ्याच वेबसाइटवर फाइल दुसऱ्याला पाठवण्याआधी त्यांच्या वेबसाइटवर मोफत नांेदणी करावी लागते. म्हणूनच खाली काही मोजक्या वेबसाइटची यादी दिली आहे.


याखेरीज आपल्याला गुगलवर send large files असा सर्च दिल्यास आणखी काही ऑप्शन मिळू शकतील. सध्यातरी दोन जीबीपर्यंतच्या आकाराची फाइल आपल्यासाठी मोठी असल्याने या अशा मोफत सेवेचा फाइल पाठवण्यासाठी वापर करायला हरकत नाही. एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायला हवी, ती म्हणजे मोठी फाइल पाठवणं जरी मोफत असलं तरी ती फाइल जिथे पाठवलीय तिथल्या इंटरनेटचा वेग चांगला असायला हवा.
Land Measurement Table
1 Hectare = 2.5 Acres
1 Acre = 40 Gunthas
1 Guntha = 121 sq. yards = 101.17 sq. metres
1 Guntha = 33 ft. x 33 ft. = 1089 sq. feet
1 Acre = 4840 sq.yards
1 Acre = 4067.23 sq. metres
1 Acre = 43,560 sq. feet
1 sq. yard = 0.8361 sq. metre
1 sq. metre = 1.190 sq.yards
1 sq. yard = 9 sq. feet
1 sq. metre = 10.76 sq.feet

2010 Sankashti Chaturthi Dates


Sankashti Chaturti 2010 Dates – Ganesh Sankashta Chaturthi Vrata
Ganesh Sankashta Chaturthi Vrata, is an auspicious day dedicated to Lord Ganesha in a Hindu lunar month. Below are the dates of Sankashti Chaturti in 2010. Ganesh Sankashta Chaturthi Vrata falls on the 4th day of the Krishna Paksha (waning phase of moon) of lunar fortnight or on the fourth day after full moon or Purnima. Ganesha devotees observe a fast (fasting – upvaas) on Sankashta Chaturthi Vrata days.
Sankashti Chaturti days in 2010 is based on Indian Standard Time (IST).

January 3, 2010 – Sankashti Chaturti - Sunday
February 2, 2010 – Angarak Sankashti Chaturti – Tuesday
March 3, 2010 – Sankashta Chaturthi – Wednesday
April 2, 2010 – Sankashti Chaturthi – Friday
May 1, 2010 – Sankashta Chaturthi – Saturday
May 31, 2010 – Sankashti Chaturti – Monday
June 30, 2010 – Sankashta Chaturti – Wednesday
July 29, 2010 – Sankashti Chaturti – Thursday
August 28, 2010 – Sankashta Chaturti – Saturday
September 26, 2010 – Sankashti Chaturti – Sunday
October 26, 2010 – Angarak Sankashti Chaturti – Tuesday
November 25, 2010 – Sankashta Chaturti – Thursday
December 24, 2010 – Sankashti Chaturthi – Friday

When the Sankashti Chaturti falls on the Tuesday it is known as Angarak Sankashti and is considered highly auspicious.