Tuesday, May 29, 2012

निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु
अखंडस्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी

नरपती, हयपती, गजपती, गडपती, भूपती, जळपती
पुरंदर आणि शक्ती, पृष्ठभागी

यशवंत, किर्तीवंत, सामर्थ्यवंत, वरदवंत
पुण्यवंत, नीतीवंत, जाणता राजा

आचार शील, विचारशील, दानशील, धर्मशील
सर्वज्ञपणे सुशील, सकळांठायी

धीर उदार गंभीर, शूर क्रियेसी तत्पर
सावधपणे नृपवर, तुच्छ केले

देव धर्म गोब्राम्हण, करावया संरक्षण
हृदयस्थ झाला नारायण, प्रेरणा केली

या भूमंडळाचे ठायी, धर्मरक्षी ऐसा नाही
महाराष्ट्र धर्म राहिला काही, तुम्हा कारणे

कित्येक दुष्ट संहारिला, कित्येकांसी धाक सुटला
कित्येकांस आश्रय जाहला, शिवकल्याण राजा

Tuesday, May 8, 2012

भातुकलीच्या खेळामधली.....



भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी
अर्ध्यावरती डाव मोडला, अधुरी एक कहाणी ॥धृ॥

राजा वदला , "मला समजली शब्दांवाचुन भाषा
माझ्या नशिबासवे बोलती, तुझ्या हातच्या रेषा ''
कां राणीच्या डोळा तेव्हा, दाटुनी आले पाणी ? ॥१॥

राणी वदली बघत एकटक दूर दुरचा तारा
"उद्या पहाटे दुसऱ्या वाटा, दुज्या गांवचा वारा "
पण राजाला उशिरा कळली गूढ अटळ ही वाणी ॥२॥

तिला विचारी राजा, " कां हे जीव असे जोडावे ?
कां दैवाने फुलण्याआधी फूल असे तोडावे ?''
या प्रश्नाला उत्तर नव्हते, राणी केवलवाणी ॥३॥

कां राणीने मिटले डोळे दूर दुर जाताना ?
कां राजाचा श्वास कोंदला गीत तिचे गाताना ?
वाऱ्यावरती विरुन गेली एक उदास विराणी ॥४॥