Friday, June 22, 2012


ढासळले बुरुज तटाला खिंडारे पडली
ना राहिल्या तोफा ना शिबंदीउरली...
हल्ले होत नाहीत आता ना नगारा दुमदुमतो
पडझडलेल्या भिंतींमधून वारा फक्त वाहतो...
फत्तराच्या काळजातला एक एक चिरा निखळून
पडतोय
राजे तुमच्या आठवणींनी उर भरून येतोय...
सह्याद्रीच्या खांद्यांवर मी आजही उभा आहे
तुमच्या कणखर इराद्यांची जाणीव मला आहे
उभाच राहीन मी सांगेन
गाथा तुमच्या पराक्रमाची
आठवण सदा करून देईन
मराठ्यांच्या इतिहासाची||


मुजरा राजं मुजरा