Monday, July 2, 2012

गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु:
गुरुर्देवो महेश्वरः l
गुरु: साक्षात् परब्रम्ह
तस्मै श्रीगुरुवे नमः ||

आपण सर्वांना गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !!

आमच्या राजांना,
मातेच्या ममतेबरोबरच प्रसंगी गुरूच्या कठोरपणाने घडवणाऱ्या जिजाऊच्या चरणाजवळ आजच्या गुरु पौर्णिमेच्या दिवशी विनम्र अभिवादन...

जय जिजाऊ !
जय शिवराय !!
जय शंभू राजे !!

Friday, June 22, 2012


ढासळले बुरुज तटाला खिंडारे पडली
ना राहिल्या तोफा ना शिबंदीउरली...
हल्ले होत नाहीत आता ना नगारा दुमदुमतो
पडझडलेल्या भिंतींमधून वारा फक्त वाहतो...
फत्तराच्या काळजातला एक एक चिरा निखळून
पडतोय
राजे तुमच्या आठवणींनी उर भरून येतोय...
सह्याद्रीच्या खांद्यांवर मी आजही उभा आहे
तुमच्या कणखर इराद्यांची जाणीव मला आहे
उभाच राहीन मी सांगेन
गाथा तुमच्या पराक्रमाची
आठवण सदा करून देईन
मराठ्यांच्या इतिहासाची||


मुजरा राजं मुजरा

Tuesday, May 29, 2012

निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु
अखंडस्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी

नरपती, हयपती, गजपती, गडपती, भूपती, जळपती
पुरंदर आणि शक्ती, पृष्ठभागी

यशवंत, किर्तीवंत, सामर्थ्यवंत, वरदवंत
पुण्यवंत, नीतीवंत, जाणता राजा

आचार शील, विचारशील, दानशील, धर्मशील
सर्वज्ञपणे सुशील, सकळांठायी

धीर उदार गंभीर, शूर क्रियेसी तत्पर
सावधपणे नृपवर, तुच्छ केले

देव धर्म गोब्राम्हण, करावया संरक्षण
हृदयस्थ झाला नारायण, प्रेरणा केली

या भूमंडळाचे ठायी, धर्मरक्षी ऐसा नाही
महाराष्ट्र धर्म राहिला काही, तुम्हा कारणे

कित्येक दुष्ट संहारिला, कित्येकांसी धाक सुटला
कित्येकांस आश्रय जाहला, शिवकल्याण राजा

Tuesday, May 8, 2012

भातुकलीच्या खेळामधली.....



भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी
अर्ध्यावरती डाव मोडला, अधुरी एक कहाणी ॥धृ॥

राजा वदला , "मला समजली शब्दांवाचुन भाषा
माझ्या नशिबासवे बोलती, तुझ्या हातच्या रेषा ''
कां राणीच्या डोळा तेव्हा, दाटुनी आले पाणी ? ॥१॥

राणी वदली बघत एकटक दूर दुरचा तारा
"उद्या पहाटे दुसऱ्या वाटा, दुज्या गांवचा वारा "
पण राजाला उशिरा कळली गूढ अटळ ही वाणी ॥२॥

तिला विचारी राजा, " कां हे जीव असे जोडावे ?
कां दैवाने फुलण्याआधी फूल असे तोडावे ?''
या प्रश्नाला उत्तर नव्हते, राणी केवलवाणी ॥३॥

कां राणीने मिटले डोळे दूर दुर जाताना ?
कां राजाचा श्वास कोंदला गीत तिचे गाताना ?
वाऱ्यावरती विरुन गेली एक उदास विराणी ॥४॥

Tuesday, April 24, 2012

अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर आज पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला सुमारे ११००० आंब्यांची सजावट करण्यात आली होती.त्याचा हा मनोहारी फोटो.. अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा !!!!!!!!!!!!!


Friday, March 16, 2012

प्रतीक्षा संपली, सचिनचा 'शतकोत्सव' साकारला!


मटा ऑनलाइन वृत्त । मीरपूर

...अन् आपल्या सचिननं क्रिकेटविश्वात आणखी एक इतिहास रचला. जगभरातील क्रिकेटवेडे वर्षभर ज्या क्षणाची आतूरतेनं वाट पाहत होतं, तो सचिनच्या ‘ शतकोत्सवा ’ चा क्षण आज बांगलादेशात साकारला आणि हा अनुपम्य सोहळा डोळ्यात साठवून ठेवताना सारेच कृतकृत्य होऊन केले. ‘ महाशतक ’ साकारल्यानंतर बॅट आणि हेल्मेट उंचावून आकाशाकडे पाहत सचिननं देवाचे आभार मानले, तेव्हा क्रिकेटच्या या देवाला सा-यांनीच सलाम केला.

क्रिकेटविश्वाचा अनभिषिक्त सम्राट, अनेक विक्रमांचा बादशाह असलेल्या सचिन तेंडुलकरला त्याच्या कारकीर्दीतलं शंभरावं शतक वर्षभरापासून हुलकावणी देत होतं. १२ मार्च २०११ ते १५ मार्च २०१२ या काळात इंग्लंड दौरा झाला, वेस्ट इंडिजविरुद्धची मायदेशातील कसोटी मालिका झाली, भलामोठा ऑस्ट्रेलिया दौरा झाला, पण सचिनच्या ‘ महाशतका ’ साठी काही मुहूर्त सापडत नव्हता. दोनदा तर नव्वदीच्या घरात जाऊनही सचिनच्या पदरी निराशा पडली होती. तमाम क्रिकेटप्रेमींच्या अपेक्षा सामन्यागणिक वाढत होत्या आणि लिटिल मास्टरच्या खांद्यावरचं ओझं जड-जड होत होतं. पण आज आशिया कप स्पर्धेत बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात, झालं गेलं सगळं विसरून, सगळी बंधनं झुगारून देत सचिन बिनधास्तपणे खेळला आणि शेरे बांगला स्टेडियमवर भारताच्या या ‘ वाघा ’ नं डरकाळी फोडली.

बांगलादेशच्या शकील अल् हसनचा चेंडू हलकेच टोलवून सचिन तेंडुलकरनं शंभरावी धाव घेतली, तेव्हा सारं स्टेडियम, पॅव्हेलियन ‘ उसळलं ’ . पण सचिनच्या चेह-यावरची धन्यता, समाधान केवळ अवर्णनीय होतं. सुरेश रैनासह बांगलादेशच्या क्रिकेटपटूंकडून शुभेच्छा स्वीकारतानाच, त्यानं आपलं हेल्मेट काढलं आणि बॅट उंचावून डोळे मिटून आकाशाकडे पाहत देवाचे आभार मानले. सचिनचा आनंद त्याच्या डोळ्यात तरळत होता आणि तो पाहून त्यांच्या चाहत्यांनाही गदगदून आलं.

कसोटी आणि वनडे किक्रेटमध्ये सर्वाधिक धावा सचिनच्या नावावर जमा आहेत. त्यात ५१ कसोटी शतकांचा समावेश असून त्याचं आजचं शतक वनडेतील ४९वं शतक ठरलं. १३८ चेंडूत १० चौकार आणि एका षटकाराच्या मदतीनं सचिननं हा महापराक्रम केला. बांगलादेशविरुद्धचा सामना म्हणजे सचिनला आपलं बहुप्रतिक्षित शतक साकारण्याची नामी संधी असल्याचं क्रिकेटवर्तुळात बोललं जात होतं. त्यामुळे मास्टर ब्लास्टरवरचा दबाव अधिकच वाढला होता. परंतु, पहिल्या चेंडूपासून तो अत्यंत नेटानं, आत्मविश्वासानं, जिद्दीनं खेळला. अर्धशतक पूर्ण झाल्यानंतर, ८० ते १०० या टप्प्यात सचिननं अत्यंत सावध पवित्रा घेतल्याचं पाहायला मिळालं. त्यातच अर्धशतकवीर विराट कोहली तंबूत परतल्यानं सचिनवर दबाव आणखी वाढला होता. पण, या धक्क्यानं जराही न डगमगता तो पीचवर टिच्चून उभा राहिला आणि ‘ महाशतका ’ चं स्वप्न साकार करून त्यानं आपल्या ‘ भक्तां ’ ना प्रसन्न केलं.

आशिया कपमधील आजचा सामना अविस्मरणीय करणारा सचिन ११४ धावांवर बाद झाला. शतकानंतर त्यानं फटकेबाजी सुरू केली होती, पण मश्रफी मूर्तझानं त्याला चकवलं. सचिनचं ऐतिहासिक शतक आणि कोहली-रैनाच्या अर्धशतकांच्या जोरावर टीम इंडियानं बांगालदेशपुढे २९० धावांचं आव्हान ठेवलंय.

Tuesday, March 6, 2012

होळी का साजरी करतात ?

पिंकी:- आजोबा होळी का साजरी करतात ?

आजोबा :- बेटा कारण, भक्त प्रल्हाद हा नेहमी नारायणाचे ध्यान करायचा, पण त्याचे वडील जे हिरण्यकषप्यू त्यांना हि गोष्ट बिलकुल आवडायची नाही, त्यामुळे ते प्रल्हादावर भरपूर अत्याचार करायचे व त्यास मारण्याचे भरपूर प्रयत्न करायचे, पण नारायणाच्या कृपेने भक्त प्रल्हाद नेहमी सुखरूप रहायचा, हे बघून एके दिवशी हिरण्यकषप्यूने आपली बहिण होलिका हिला, "प्रल्हादाला घेऊन आगीत उडी टाक, म्हणजे जाळून तो खाक होईल !!" असा आदेश दिला ( होलिका ला आगी मध्ये न जळण्याचा वर मिळाला होता, त्यामुळे तिला आगी पासून काहीच धोका नव्हता ) ...... नंतर होलिका ने प्रल्हादाला मांडीवर घेतले व भीषण आगीमध्ये उडी टाकली, परंतु देवाच्या भक्ताचे छळ केल्यास तुमच्या पापांची घटिका भरून येते व मिळविलेले सर्व पुण्य वाया जाते, ह्या शिकवणीची जाणीव सर्वांना सदैव रहावी म्हणून देवाने तो वर मागे घेतला व होलिका त्या आगी मध्ये जाळून खाक झाली ........... आणि नारायणाच्या कृपेने प्रल्हाद पुन्हा एकदा सुखरूप पणे आगीतून बाहेर आला.
म्हणून साधू, संताना, भक्तांना तसेच अशक्त लोकांना त्रास देऊ नये व नेहमी नारायणाचे स्मरण रहावे ह्यासाठी होळी हा सण साजरा कला जातो !!

पिंकी :- धन्यवाद आजोबा, मी नेहमी देवाचे नांव घेत जाईन.

Happy Holi :)

Tuesday, February 7, 2012

गेटवरचा तो रोजचा चेहरा ....

गेटवरचा तो रोजचा चेहरा
आज थोडा उदास दिसला
आपुलकीन बघत माझ्याकडे
थोडे हळूच उसन हसला

"निघालास ना शेवटी ....
.... खूप आठवशील रं साह्यबा
नवीन मानस .... अन तू साधा
.... स्वत:ची काळजी घे रं बाबा"
.
.
.
रोज त्याने मला चहा पाजला होता
सकाळ-संध्याकाळ सलाम ठोकला होता
मला आवडतो म्हणून डब्यात शिरा आणला होता
रात्री थांबलो होतो तेव्हा ओरडलाही होता
.
.
.
मी पाकीट काढलं, त्याने हात जोडले
मी पैसे काढले, त्याने डोळे मिटले
"बस सुखात रहा" त्याचे ओठ हलले
आशीर्वादाचे पाठीवर कापरे हात फिरले

मी पाहिलं त्या डोळ्यांत माया साठलेली
सांगताना मला ओसंडून वाहिलेली
मग दोन-चार आसवे खळकन ओघळली
सांडताना मला जाऊ नको म्हणाली
.
.
.
कोण ही माणस, कुठून आली होती
ना ठाऊक केव्हा, कधी जुळली नाती
का लावतात जीव, का वाटतात आपली
का आपल्या दु:खाची, त्यांना काळजी होती
.
.
.
चल येतो म्हणत मी त्याला ओझरता पाहिला
त्याने मग शेवटचा सलामही केला
त्याचा हात तसाच तिथेच अडकला
काळजावर माझ्या उगीच दगड ठेऊन गेला

मी हताश तसाच पायऱ्या उतरलो
चाललोय कुठे सारे विसरलो
मागे पहायचं धाडस होईना
नकळत साऱ्या आठवणीत हरवलो

.... गेटवरचा तो रोजचा चेहरा

Sunday, January 29, 2012

आज जागतिक सूर्यनमस्कार दिन...........


सूर्यनमस्कार हा भारतीय परंपरेतला एक परिपूर्ण व्यायाम आहे. शास्त्रशुध्द पध्दतीने केला तर यात व्यायामाची बहुतेक सर्व अंगे आपोआप साधतात. स्नायूंचा व्यायाम, श्वसनाचे व्यायाम, प्राणायाम, हृदयक्रिया वाढणे, ताण-लवचीकता, पोटातील अवयवांचा व्यायाम इ. बहुतेक सर्व गरजा यात पूर्ण होतात. कमीत कमी बारा सूर्यनमस्कार घालावेत, व सोबत मन प्रसन्न-एकाग्र करण्याचा अभ्यास करावा. सूर्यनमस्कार घालण्याची पध्दत पुढे दिली आहे.

(1) सुरवातीला सावधान मुद्रेत सरळ उभे राहावे. त्यानंतर दोन्ही हात खांद्याच्या समांतर रेषेत ठेवून डोक्याच्या दिशेने सरळ करावे. दोन्ही हाताचे पंजे जोडावे व त्याच अवस्थेत त्यांना खाली आणावे. म्हणजे आपण देवाला नमस्कार करतो त्या अवस्थेत उभे राहावे.

(2) जोरात श्वास घेऊन दोन्ही हात कानाला चिकटून राहतील अशा स्थितीत आणून मान व दोन्ही हात मागील बाजूने वाकवावे. असे करत असताना हे लक्षात घेणे गरजेचे आहे की, कानही ताठ राहिले पाहिजेत.

(3) तिसर्‍या अवस्थेत श्वास हळू हळू सोडून पुढच्या बाजूने वाकावे. कानाला चिकटलेल्या अवस्थेत हात जमिनीला ठेकवावे. गुडघे सरळ ठेवावेत. काही क्षण अशा अवस्थेत थांबावे. या अवस्थेला 'पाद पश्चिमोत्तनासन' म्हटले जाते.

(4) त्यानंतर श्वास हळू हळू घेऊन डाव्या पायाच्या मागच्या बाजूला न्यावे. छातीला पुढच्या बाजूला जेवढे ताणता येईल तेवढे ताणावे. मान मागच्या बाजूला न्यावी. पाय ताणलेल्या अवस्थेत व शरीराच्या पुढच्या बाजूला ताणलेले अशा स्थितीत काही क्षण राहावे.

(5) श्वास हळू हळू सोडून उजवा पाय देखील डाव्या पायाप्रमाणे मागच्या बाजूला न्यावा. यावेळी दोन्ही पायाचे पंजे एकमेकाशी जोडलेले पाहिजेत. शरीर पायाच्या बाजूने ओढावे व पायाच्या टाचा जमिनीला टेकण्याचा प्रयत्न करावा. कमरेला जास्तीत जास्त वर उचलण्याचा प्रयत्न करावा.

(6) श्वास घेत शरीराला जमिनीच्या समांतर ठेवून साष्टांग दंडवत घालावे व सुरवातीला गुडघे, छाती व डोके जमिनीला टेकवावे. यावेळी कंबर वरच्या बाजूला उचललेली पाहिजे. श्वास सामान्य गतीने सुरू ठेवावा.

(7) दोन्ही हातांवर जोर देऊन छातीला पुढच्या बाजूने ओढावे. मान सरळ ठेवून मागच्या बाजूने न्यावी. गुडघ्याचा जमिनीला स्पर्श करून पायाचे पंजे उभे ठेवावे. या अवस्थेला 'भुजंगासन' म्हटले जाते.

(8) ही अवस्था - पाचव्या अवस्थेसारखी आहे.

(9) ही अवस्था - चौथ्या अवस्थेसारखी आहे.

(10) ही अवस्था - तिसर्‍या अवस्थेसारखी आहे.

(11) ही अवस्था - दुसर्‍या अवस्थेसारखी आहे.

(12) ही अवस्था - पहिल्या अवस्थेसारखी राहील.

वरील बारा पायर्‍या केल्यानंतर थोडा विश्राम करण्यासाठी ताठ सरळ उभे राहावे. त्यानंतर पुन्हा हे आसन करावे. पहिली, दुसरी व तिसऱ्या अवस्थांचा क्रम आधी केल्याप्रमाणेच राहील. मात्र, चौथी अवस्थेत जेथे डावा पाय मागे केला होता तेथे आता उजवा पाय मागे करत सूर्यनमस्कार करावा.

इशारा : ज्या व्यक्तींना कंबर व पाठीच्या मणक्याचे आजार आहे त्यांनी हे आसन करून नये. त्यांनी सूर्यनमस्कार करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.

फायदा : सूर्यनमस्कार सर्वांसाठीच लाभदायी आहे. सूर्यनमस्कार नियमित केल्याने हातपायाचे दुखणे दूर होऊन त्यांच्यात बळकटपणा येतो. मान, छाती व हाताची दंड भरतात. शरीरावरील बिनकामाची चरबी कमी होते.

सूर्यनमस्कार केल्याने त्वचेचे आजारही कायमचे दूर होतात. नियमित केल्याने पोटाच्या समस्या नाहीशा होऊन पचन क्रिया वाढते. अतिनिद्रा, अल्सर आदी आजारही नाहीसे होतात.

Friday, January 13, 2012

चाणक्य नीती : या 5 गोष्टी कुणालाही सांगू नका

चाणक्य नीती : या 5 गोष्टी कुणालाही सांगू नका; यातच आहे शहाणपण आहे --------------

जीवनात अनेक गोष्टींमुळे आपण अडचणीत सापडत असतो. या गोष्टींवर आपले नियंत्रण नसते. परंतु अनेकदा चुकून आपण अशा गोष्टी करतो की ज्यामुळे आपणच भविष्यात अडचणीत येतो. अशा गोष्टींविषयी आचार्य चाणक्य म्हणतात-

अरथ नाश मन ताप अरु, दा चरि घर माहिं।

वंचनता अपमान निज, सुधी प्रकाशत नाहिं।।

आर्थिक हानी, मनातील दु:ख, पत्नीचे चारित्र्य, नीच माणसाने सांगितलेल्या गोष्टी, एखाद्याने केलेला अपमान या गोष्टी कधीही कोणालाही सांगू नका, यातच शहाणपण आहे.

आचार्य चाणक्य सांगतात की, शहाणा मनुष्य सदैव आपल्या कमतरता आणि गुप्त गोष्टी गुप्तच ठेवत असतो. जे लोक अशा गोष्टी इतरांना सांगतात, ते भविष्यात कधी ना कधी अडचणीत येतात. आपण कधीही आपल्या आर्थिक स्थितीविषयी खरी माहिती इतरांना सांगू नये. आपल्याला कोणत्या गोष्टींमुळे दु:ख होते, मनातील दु:ख किंवा संतापही गुप्त ठेवले पाहिजे. जवळपास प्रत्येक विवाहित माणसाच्या जीवनात काही ना काही अडचणी असतातच. त्यामुळे नवरा-बायकोतील या गोष्टी चुकूनही इतरांना सांगू नये.

कधी-कधी नीच व्यक्ती किंवा संस्कारहीन व्यक्तीशी वाद-विवाद होण्याची शक्यता असते. अशा वेळी त्या लोकांच्या शब्दांत काहीही गांभीर्य नसते. त्यामुळे त्या लोकांच्या तोंडून आलेली माहितीही कोणासमोर सांगू नये. चाणक्य म्हणतात की, तुम्हालाही अपमान सोसावे लागले असेल तरीही त्याविषयी इतरांसमोर काहीही बोलू नका.

या सा-या गोष्टी इतरांसमोर सांगितल्याने लाभ तर काहीच नाही, पण भविष्यात आपण संकटांत येऊ शकू. त्यामुळे या गोष्टी गुप्तच ठेवणे चांगले.