Wednesday, January 27, 2010

इ-मेल करा मोठी फाइल

इ-मेल करा मोठी फाइल
कामाच्या भल्यामोठ्या फाइल ई-मेलवरून कशा पाठवयाच्या असा प्रश्न पडलाय... तर त्यावर उपायही आहे. .....................

टेलिफोन लाइनमधून इंटरनेट, मग केबलमधून, नंतर ब्रॉडबँड केबलमधून असा प्रवास करत यूएसबी मोडेम या केबलरहित म्हणजेच वायरलेस इंटरनेट वापरात आलं आहे. इंटरनेटची केबल वायरलेस मोडेमला जोडली की त्याच्या जवळच्या काही परिसरामध्ये आपण कम्प्युटरमधील वाय-फाय प्रणालीच्या मदतीने इंटरनेट वापरू शकतो. परंतु यामध्ये त्या वायरलेस मोडेमच्या जवळपासच्या कम्प्युटरवरच चांगल्या प्रकारे इंटरनेट चालतं. म्हणून मग प्रवासामध्ये अथवा बाहेरगावी असताना इंटरनेटमुळे थांबणारी कामं यूएसबी मोडेमच्या मदतीने पूर्ण होऊ लागली. इंटरनेटचा वेग आता वाढलाय. साधारण दहा वर्षापूवीर् इंटरनेटचा वेग हा जेमतेमच होता साधारण ८-१६ केबी/पीएस म्हणजेच ८ ते १६ किलो बाइट साइज एका सेकंदाला. तर सध्या इंटरनेटचा वेग आता एका सेकंदाला मेगाबाइटवरून गिगाबाइटच्या दिशेने चालला आहे. म्हणजेच मोठ्या आकाराची फाइल आपण काही सेकंदात इ-मेलने पाठवू शकतो.

इंटरनेटचा वेग जितका जास्त तितकी फाइल लवकर पाठवली जाते. इंटरनेटची प्रणाली आणि इंटरनेटचा वेग यामध्ये जरी आमूलाग्र बदल झाले असले तरी इ-मेलने फाइलने पाठवण्याच्या क्षमतेमध्ये अजून तितकीशी प्रगती झालेली दिसत नाही. आजही जी-मेल, याहू, हॉटमेल आणि रिडीफ यासारख्या मोफत इ-मेल सेवा देणाऱ्या कंपन्या २० एमबीपेक्षा मोठी फाइल पाठवण्याची सेवा देत नाहीत. विकत इ-मेल सेवा देणाऱ्या कंपन्याही २०-२५ एमबीपेक्षा मोठी फाइल इ-मेलनं पाठवण्याची सोय देत नाहीत. व्हिडीओ अथवा काही वेगळ्या कामाच्या फाइल्स ज्याची साइज काही एमबी ते जीबी इतकी असते त्या इ-मेलवरून पाठवणं शक्य होत नाही. परिणामी आपलं काम थांबतं.

आकाराने मोठ्या असलेल्या फाइल्स पाठवण्यासाठीच सध्या निरनिराळ्या वेबसाइट सुरू झाल्या आहेत. ही सेवाही त्या मोफत देत असतात. अशा वेबसाइटवर आपल्याला आपलं नाव आणि इ-मेल तसंच ज्याला ती मोठी फाइल पाठवायची असेल त्याचं नाव आणि इ-मेल द्यायचा असतो. तिथे आपली भली मोठी फाइल 'अटॅच' करण्याची सोय असते. इथे ती फाइल त्या वेबसाइटवर अपलोड होते आणि मग ती तेथून डाउनलोड करण्याची लिंक आपल्याला ज्याला ती फाइल पाठवायची असेल त्याला जाते. त्या व्यक्तीने त्याला आलेल्या इ-मेलमध्ये दिलेल्या फाइल डाऊनलोडच्या लिंकवर क्लिक केल्यास ती फाइल डाउनलोड करता येते. अशा प्रकारे आपणास जी मोठी फाइल इ-मेलनं पाठवायची असते ती प्रत्यक्ष त्या व्यक्तीला न जाता ती त्या वेबसाइटवरवर अपलोड होते आणि त्या फाइलला डाउनलोड करण्याचीच लिंक इ-मेलमध्ये पाठवली जाते.

अशा प्रकारची सेवा विकतही दिली जाते. मोफत सेवेमध्ये जास्तीत जास्त २ जीबीपर्यंतचीच फाइल आपण दुसऱ्याला पाठवू शकतो तर त्यापेक्षा मोठ्या फाइलसाठी काही पैसे मोजावे लागतात. बऱ्याच वेबसाइटवर फाइल दुसऱ्याला पाठवण्याआधी त्यांच्या वेबसाइटवर मोफत नांेदणी करावी लागते. म्हणूनच खाली काही मोजक्या वेबसाइटची यादी दिली आहे.


याखेरीज आपल्याला गुगलवर send large files असा सर्च दिल्यास आणखी काही ऑप्शन मिळू शकतील. सध्यातरी दोन जीबीपर्यंतच्या आकाराची फाइल आपल्यासाठी मोठी असल्याने या अशा मोफत सेवेचा फाइल पाठवण्यासाठी वापर करायला हरकत नाही. एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायला हवी, ती म्हणजे मोठी फाइल पाठवणं जरी मोफत असलं तरी ती फाइल जिथे पाठवलीय तिथल्या इंटरनेटचा वेग चांगला असायला हवा.
Land Measurement Table
1 Hectare = 2.5 Acres
1 Acre = 40 Gunthas
1 Guntha = 121 sq. yards = 101.17 sq. metres
1 Guntha = 33 ft. x 33 ft. = 1089 sq. feet
1 Acre = 4840 sq.yards
1 Acre = 4067.23 sq. metres
1 Acre = 43,560 sq. feet
1 sq. yard = 0.8361 sq. metre
1 sq. metre = 1.190 sq.yards
1 sq. yard = 9 sq. feet
1 sq. metre = 10.76 sq.feet

2010 Sankashti Chaturthi Dates


Sankashti Chaturti 2010 Dates – Ganesh Sankashta Chaturthi Vrata
Ganesh Sankashta Chaturthi Vrata, is an auspicious day dedicated to Lord Ganesha in a Hindu lunar month. Below are the dates of Sankashti Chaturti in 2010. Ganesh Sankashta Chaturthi Vrata falls on the 4th day of the Krishna Paksha (waning phase of moon) of lunar fortnight or on the fourth day after full moon or Purnima. Ganesha devotees observe a fast (fasting – upvaas) on Sankashta Chaturthi Vrata days.
Sankashti Chaturti days in 2010 is based on Indian Standard Time (IST).

January 3, 2010 – Sankashti Chaturti - Sunday
February 2, 2010 – Angarak Sankashti Chaturti – Tuesday
March 3, 2010 – Sankashta Chaturthi – Wednesday
April 2, 2010 – Sankashti Chaturthi – Friday
May 1, 2010 – Sankashta Chaturthi – Saturday
May 31, 2010 – Sankashti Chaturti – Monday
June 30, 2010 – Sankashta Chaturti – Wednesday
July 29, 2010 – Sankashti Chaturti – Thursday
August 28, 2010 – Sankashta Chaturti – Saturday
September 26, 2010 – Sankashti Chaturti – Sunday
October 26, 2010 – Angarak Sankashti Chaturti – Tuesday
November 25, 2010 – Sankashta Chaturti – Thursday
December 24, 2010 – Sankashti Chaturthi – Friday

When the Sankashti Chaturti falls on the Tuesday it is known as Angarak Sankashti and is considered highly auspicious.