Monday, December 16, 2019


















शुभंकरोती कल्याणम


शुभंकरोती कल्याणम
आरोग्यम धनसंपदाम
शत्रुबुद्धी विनाशाय
दिपज्योती नमोस्तुते

दिव्या दिव्या दिपत्कार
कानी कुंडल मोतीहार
दिव्याला पाहून नमस्कार
दिवा लावला देवापाशी
उजेड पडला तुळशीपाशी
माझा नमस्कार सर्व देवांच्या पायापाशी

तिळाचं तेल कापसाची वात
दिवा जळूदे सारी रात
घरातली पीडा बाहेर जावो
बाहेरची लक्ष्मी घरात येवो
घरच्या सर्वांना उदंड आयुष्य लाभो देवो.
















|| श्री गणपती स्तोत्र ||

साष्टांग नमन हे माझे गौरी पुत्रा विनायका
भक्तीने स्मरता नित्य आयुकामार्थ साधती

प्रथम नाव वक्रतुंड, दुसरे एकदंत ते,
तिसरे कृष्णपिंगाक्ष, चवथे गजवक्र ते,

पाचवे श्री लंबोदर, सहावे विकट नाव ते,
सातवे विघ्नराजेंद्र, आठवे धुम्रवर्ण ते,

नववे श्री भालचंद्र, दहावे श्री विनायक,
अकरावे गणपती, बारावे श्री गजानन,

देव नावे अशी बारा तीन संध्या म्हणे नर,
विघ्न भीती नसे त्याला प्रभो तु सर्व सिध्दीत,

विद्यार्थाला मिळे विद्या , धन्यार्थाला मिळे धन,
पुत्रार्थाला मिळे पुत्र, मोक्षार्थाला मिळे गती,

जपता गणपती स्तोत्र सहा मासात हे फळ,
एक वर्ष पुर्ण होता मिळे सिध्दी न संशय,

नारदांनी रचिलेले झाले संपुर्ण स्तोत्र हे,
श्रीधराने मराठित पठण्या अनुवादिले.

*****जय श्री गणेशाय नमो नमः*****

गायत्री मंत्र

ॐ भूर्भुवः स्वः
तत्सवितुर्वरेण्यम्
भर्गो देवस्य धीमहि।
धियो यो नः प्रचोदयात्॥

Monday, July 2, 2012

गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु:
गुरुर्देवो महेश्वरः l
गुरु: साक्षात् परब्रम्ह
तस्मै श्रीगुरुवे नमः ||

आपण सर्वांना गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !!

आमच्या राजांना,
मातेच्या ममतेबरोबरच प्रसंगी गुरूच्या कठोरपणाने घडवणाऱ्या जिजाऊच्या चरणाजवळ आजच्या गुरु पौर्णिमेच्या दिवशी विनम्र अभिवादन...

जय जिजाऊ !
जय शिवराय !!
जय शंभू राजे !!

Friday, June 22, 2012


ढासळले बुरुज तटाला खिंडारे पडली
ना राहिल्या तोफा ना शिबंदीउरली...
हल्ले होत नाहीत आता ना नगारा दुमदुमतो
पडझडलेल्या भिंतींमधून वारा फक्त वाहतो...
फत्तराच्या काळजातला एक एक चिरा निखळून
पडतोय
राजे तुमच्या आठवणींनी उर भरून येतोय...
सह्याद्रीच्या खांद्यांवर मी आजही उभा आहे
तुमच्या कणखर इराद्यांची जाणीव मला आहे
उभाच राहीन मी सांगेन
गाथा तुमच्या पराक्रमाची
आठवण सदा करून देईन
मराठ्यांच्या इतिहासाची||


मुजरा राजं मुजरा

Tuesday, May 29, 2012

निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु
अखंडस्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी

नरपती, हयपती, गजपती, गडपती, भूपती, जळपती
पुरंदर आणि शक्ती, पृष्ठभागी

यशवंत, किर्तीवंत, सामर्थ्यवंत, वरदवंत
पुण्यवंत, नीतीवंत, जाणता राजा

आचार शील, विचारशील, दानशील, धर्मशील
सर्वज्ञपणे सुशील, सकळांठायी

धीर उदार गंभीर, शूर क्रियेसी तत्पर
सावधपणे नृपवर, तुच्छ केले

देव धर्म गोब्राम्हण, करावया संरक्षण
हृदयस्थ झाला नारायण, प्रेरणा केली

या भूमंडळाचे ठायी, धर्मरक्षी ऐसा नाही
महाराष्ट्र धर्म राहिला काही, तुम्हा कारणे

कित्येक दुष्ट संहारिला, कित्येकांसी धाक सुटला
कित्येकांस आश्रय जाहला, शिवकल्याण राजा

Tuesday, May 8, 2012

भातुकलीच्या खेळामधली.....



भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी
अर्ध्यावरती डाव मोडला, अधुरी एक कहाणी ॥धृ॥

राजा वदला , "मला समजली शब्दांवाचुन भाषा
माझ्या नशिबासवे बोलती, तुझ्या हातच्या रेषा ''
कां राणीच्या डोळा तेव्हा, दाटुनी आले पाणी ? ॥१॥

राणी वदली बघत एकटक दूर दुरचा तारा
"उद्या पहाटे दुसऱ्या वाटा, दुज्या गांवचा वारा "
पण राजाला उशिरा कळली गूढ अटळ ही वाणी ॥२॥

तिला विचारी राजा, " कां हे जीव असे जोडावे ?
कां दैवाने फुलण्याआधी फूल असे तोडावे ?''
या प्रश्नाला उत्तर नव्हते, राणी केवलवाणी ॥३॥

कां राणीने मिटले डोळे दूर दुर जाताना ?
कां राजाचा श्वास कोंदला गीत तिचे गाताना ?
वाऱ्यावरती विरुन गेली एक उदास विराणी ॥४॥