Monday, August 29, 2011

लालबागच्या राजाचे पहिले दर्शन (2011)










लालबागच्या राजाचे पहिले दर्शन
नवसाला पावणारा अशी ख्याती असणा:या लालबागच्या राजाची पहिली झलक आज दिसली आणि राजाची छबी टिपण्यासाठी अक्षरश: हजारो कॅमे:यांचा लखलखाट झाला. कोणी मोबाईल कॅमे:यात राजाला बंदीस्त करीत होते तर कोणी खास आणलेल्या साध्या कॅमे:यात राजाची छबी टिपली.

अलंकारांनी नटलेल्या राजाचे दर्शन झाले आणि भरून पावलो असेच शब्द प्रत्येकाच्याच तोंडून उमटले. लालबागचा राजा मंडळातर्फे आज प्रसारमाध्यमांसाठी मुखदर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माध्यमांच्या प्रतिनिधींबरोबरच सर्वसामान्यही मोठय़ा संख्येने उपस्थित होते. उत्साही भाविकांना रोखण्यासाठी सुरक्षारक्षकांचीही बरीच तारांबळ उडत होती.

भाविकांचा पाच कोटींचा विमा

- लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदा भाविकांचा पाच कोटींचा विमा उतरवला आहे. लालबागचा राजा मंडळाचे अध्यक्ष अशोक पवार यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

- भाविकांच्या विम्याबरोबरच मंडपाचा तीन कोटींचा तर राजाच्या दागिन्यांचा 6 कोटींचा विमा उतरवण्यात आला आहे. सुरक्षेचाही कडक बंदोबस्त करण्यात आला असून मंडळाचे स्वयंसेवक, खाजगी सुरक्षा रक्षक, पोलीस अशा मोठा फौजफाटा असणार आहे. संपूर्ण परिसरात 100 सीसीटीव्ही कॅमेरे, मेटल डिटेक्टर्स बसवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

- राजाच्या दर्शनाला एक सप्टेंबरला सकाळी सहा वाजल्यापासून सुरूवात होईल. तर राजाला चढवण्यात आलेल्या दागिन्यांचा लिलाव 16 ते 18 सप्टेंबर या काळात सकाळी 6 ते रात्री 10 यावेळेत होणार असल्याचेही ते म्हणाले.

2 comments: